
पावस येथे खाडीत बुडून प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे मासेमारीसाठी खाडीत गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अनिल गंगाराम पानगले (५८, रा. पावस, पानगलेवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद पूर्णगड पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल पानगले हे २७ जुलै रोजी सकाळी ८ च्या सुमारास मासेमारीसाठी पावस खाडीकिनारी येथे होते. बराच वेळ झाला तरी अनिल हे घरी परतले नसल्याने ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला. यावेळी पावस खाडीकिनारी झुडुपात अनिल हे अडकलेले आढळले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.www.konkantoday.com