वेरळनजिक अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी

मुंबई- गोवा महामार्गावरील वेरळ येथील हॉटेल गणपती कृपासमोर दुभाजकाचा अंदाज न आल्याने दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. जाफर मुल्ला (३२, रा. खेड) असे गंभीररित्या जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो एम.एच. ०८/ए.टी. ०५६३ क्रमांकाच्या दुचाकीवरून खेड येथून चिपळूण येथे जात होता. हॉटेल गणपती कृपासमोर असलेल्या दुभाजकाचा अंदाज न आल्याने त्याच्यावर जावून आदळला. अपघाताचे वृत्त कळताच सामाजिक कार्यकर्ते सुरेश हंबीर यांनी दुचाकीने उपचारासाठी तातडीने भरणे येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर व सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य केले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button