
नवी मुंबईतील खारघरमध्ये दरोडेखोरांनी फिल्मी स्टाइल दरोडा टाकत सोन्याचं दुकानं लुटलं, पहा व्हिडिओ
_नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील खारघरमध्ये दरोडेखोरांनी फिल्मी स्टाइल दरोडा टाकत सोन्याचं दुकानं लुटलं आहे.खारघर सेक्टर 35 येथील बीएम ज्वेलर्सवर रात्री 11 च्या सुमारास दरोडा पडला. तीन दरोडेखोर दुकानात शिरले, त्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या. तेथील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याचं दुकानं लुटलं. जाताना त्यांनी हवेत गोळीबार देखील केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, खारघर सेक्टर 35 येथील बीएम ज्वेलर्सवर रात्री 11 च्या सुमारास दरोडा पडला. तीन दरोडेखोर दुकानात शिरले, त्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या. तेथील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याचं दुकानं लुटलं. जाताना त्यांनी हवेत गोळीबार देखील केला. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तीन दरोडेखोर या सोन्याच्या दुकानात शिरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दुकान लुटलं. याचदरम्यान तीथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं अर्लाम वाजवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र या चोरट्यांनी त्याला मारहाण करत धमकावल्याचं देखील कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं आहे