
धर्मवीर-२ या चित्रपटाच्या प्रमोशनमधून वेळ काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणाकडे लक्ष द्यावे– ॲड. ओवेस पेचकर
शिंदे सरकारचे कोकणकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गाची पूर्णपणे वाताहात झाली आहे. वारंवार पूल कोसळत आहेत. पुलांना तडे जात आहेत. धर्मवीर-२ या चित्रपटाच्या प्रमोशनमधून वेळ काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कोकण प्रादेशिक पक्षाचे मुख्य संयोजक व मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांनी केले आहे.महाराष्ट्राची वाटचाल बिहारकडे होत चालली असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी चिपळूण शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील महामार्गावरील चौपदरीकरणातील पूल कोसळला. त्यानंतर यंदा पुलाच्या पिरलचे काम चालू असताना पिलरचा काहीसा भाग कोसळला. रविवारी खेड येथील जगबुडी नदीवरील पुलाला तडे गेले आहेत, मात्र शिंदे सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. कोकणच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ऍड. ओवेस पेचकर यांनी केली आहे. www.konkantoday.com