
त्या दोन विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून मदत
काही दिवसापुर्वी शहरातील डीबीजे महाविद्यालयाच्या आवारातील संरक्षक भिंत अतिवृष्टीमुळे कोसळून दापोली देगाव येथील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्याच दरम्यान डेरवण येथील विद्यार्थीनीचाही सावर्डेतील कापशी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.या दोन्ही घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत प्रत्येकी ४ लाख रूपयांची आर्थिक मदत शासनाकडून देण्यात आली आहे. येथील डीबीजे महाविद्यालयात वाणीज्य पदवी शाखेत द्वितीय वर्षात शिकत असलेला सिद्धांत प्रदीप घाणेकर ( १९, सध्या रा. लोटे, खेड, मुळ रा. देगाव, दापोली ) याचा कॉलेजची संरक्षण भिंत अंगावर पडून मृत्यू झाला होताडेरवण बौध्दवाडीत राहणारी आणि मूळ संगमेश्वर या तालुक्यातील कळबस्ते या गावात राहणारी श्रावणी सुधीर मोहीते (१४ ) ही विद्यार्थ्यींनी साकवा वरून जात असताना वाहून गेली होती