
शिरवलीत अनोळखी तरूणाची गळफासाने आत्महत्या
खेड तालुक्यातील शिरवली-वरचीवाडी येथील वसंत गुरव यांच्या मालकीच्या बागेत ३० ते ३५ वर्षाच्या तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. वसंत गुरव हे बागेची पाहणी करण्यासाठी केले असता अनोळखी तरूणाचा मृतदेह आंब्याच्या झाडावर लटकलेला दिसून आला. मृतदेह पूर्णतः कुजलेला होता. सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. याबाबत पोलीस स्थानकात कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. www.konkantoday.com