
आज सकाळी काजळी नदीचे पाणी पुन्हा एकदा चांदेराई बाजारपेठेत घुसले, एसटी वाहतूक बंद
* संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे काजळी नदीने धोका पातळी 4 दिवसापूर्वीच ओलांडली होती, नदी दुथडी भरून वाहत होती, नदीची पातळी कमी होईना,अखेर आज सकाळी 11 वाजता काजळी नदीचे पाणी पुन्हा एकदा चांदेराई बाजारपेठेत घुसले, अनेक दुकानदार व्यापारी गेले 4 दिवस रात्र डोळ्यात तेल घालून पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेऊन होते. अखेर आज सकाळी पाणी दुकानातून शिरले, दुकानदारांनी आपला माल, सामान सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र वैद्यकीय सेवा बंद झालेने काही रुग्णांची गैरसोय होणार आहे , बाजार पेठ पाण्यात असल्यामुळे ग्राहकांची गैरसोय तर दुकानदारांचे आर्थिक नुकसान अशी परिस्थिती आहे. पाणी भरल्यामुळे या भागातील एसटीची सेवा देखील बंद करण्यात आली आहे