
भाजपाचे नेते उमेश कुळकर्णी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून धामणसे या त्यांच्या गावामध्ये 500 हून अधिक झाडे वितरित केली
रत्नागिरी, ता. 19 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये सांगितल्यानुसार भाजपाचे माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून धामणसे या त्यांच्या गावामध्ये 500 हून अधिक झाडे वितरित केली. विद्यार्थी, ग्रामस्थ बचत गटाच्या माध्यमातून ही झाडे आपल्या घर, आवार, मंदिर, संस्था आदींच्या ठिकाणी लावून या झाडांचे जतन करणार आहेत. या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाबद्दल कुळकर्णी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.गेल्या महिन्यात मन की बात हा कार्यक्रम धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या सभागृहात प्रक्षेपित करण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या नावाने झाड लावण्याचे आवाहन केले होते. श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी हा उपक्रम गावात राबवण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून धामणसे गावात 500 रोपांचे वितरण केले.उमेश कुळकर्णी आणि जिल्हा खरेदी विक्री संघाच्या संचालिका सौ. ऋतुजा कुळकर्णी यांनी या झाडांचे वितरण केले. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना रोपांचे वितरण केले. यात आवळा, जांभूळ, कोकम, कदंब, चिंच अशा विविध 500 रोपांचे वाटप विद्यार्थी व गावातील ग्रामस्थांना करण्यात आले. या वेळी धामणसे गावचे सरपंच अमर रहाटे, उपसरपंच अनंत जाधव, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व गावचे माजी सरपंच अविनाश सखाराम तथा नाना जोशी ,माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष मुकुंद जोशी शिक्षक गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य समीर सांबरे, संजय गोनबरे, वैष्णवी धनावडे, रेश्मा डाफले माजी सरपंच विलास पांचाळ, दत्ताराम चव्हाण, प्रशांत रहाटे,दिपक जाधव, सुनिल लोखंडे , अविनाश लोखंडे ज्येष्ठ ग्रामस्थ दत्ताराम रेवाळे, मारूती लोगडे दिपक सांबरे तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.या वेळी उमेश कुळकर्णी म्हणाले की, माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण आपल्या आईवर प्रेम करतो त्याप्रमाणेच आपण आईच्या नावे झाड लावून ते जगवावे. त्या झाडावरही प्रेम करावे म्हणजे ते झाड मोठे होण्याकरिता पाणी, संरक्षण द्यावे. धामणसे गावात आज वाढदिनी जवळपास 500 रोपांचे वितरण केले आहे. अन्य ठिकाणीही अशी झाडे लावली तर रत्नागिरी जिल्ह्यात वनांचे आच्छादन नक्कीच वाढेल व ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे नुकसान कमी करणे शक्य होईल.




