
कोकण रेल्वेच्या मदतीला एसटी धावली आणि अठरा लाखाचा फायदाही झाला
अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी व विन्हेरे स्थानकादरम्यान दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सोमवारी एसटी बसमधून मुंबईकडे रवाना करण्यात आले. रत्नागिरी विभागातून एकूण १०० गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यासाठी कोकण रेल्वे सोबत एसटीचा प्रासंगिक करार करण्यात आला. यातून रत्नागिरी एसटी विभागाला एका दिवसात तब्बल १८ लाख रूपये इतके उत्पन्न प्राप्त झाले.www.konkantoday.com




