
विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी गेलेले खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांना पोलिसांनी रोखले
विशाळगड परिसरात रविवारी (दि.14) झालेल्या हिंसाचाराच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी गेलेले खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांना पोलिसांनी रोखले.पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींनाही पुढे जाण्यापासून रोखले. यावेळी प्रसार माध्यमांना का रोखलं जातंय? हे समजलं नाही, अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली. तर, सत्य कधी ना कधी बाहेर येतंच, असे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी बोलताना म्हटले. दरम्यान, पांढरेपाणी परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.