
जिंदल कंपनीच्या कंत्राटदाराकडे चोरी, तरूणाची निर्दोष मुक्तता
जिंदल कंपनीच्या बंदर विभागात मॅकॅनिकल मेंटेनन्सचे काम करणार्या प्रसाद मल्टी सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपनीकडे येणार्या गाडीतून ३० लिटर डिझेल चोरून नेल्याप्रकरणाचा निर्णय तब्बल साडेसहा वर्षानी न्यायालयाने घोषित केला. सबळ पुराव्याअभावी संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.सुबकांत सुधाकर बोहरा हा प्रसाद मल्टी सर्व्हिसेस या कंपनीत साईड इन्चार्ज म्हणून काम पहात होता. ही कंपनी जिंदलच्या बंदर विभागात मेकॅनिकल मेटेनन्सचे काम करत होती. संशयित आरोपी निनाद नंदकुमार भाटकर (३०, तवसाळ, गुहागर) हा अन्य १५ लोकांबरोबर काम करत होता. १८ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री १० च्या सुमारस भाटकर याने युटिलिटी गाडीतील ३० लिटर डिझेल चोरून नेले, अशी तक्रार जयगड सागरी पोलीस ठाण्यात बोहरा यांनी दाखल केली. याचा तपास लागून न्यायालयात आरोपपत्र सादर केले. www.konkantoday.com