
ग्लोबल कोकणच्या रौप्य महोत्सवानिमित्त संजय यादवराव यांचा भव्य सत्कार
कोकणच्या विकासासाठी तन-मन धन अर्पण करून गेली 25 वर्ष सतत कार्यरत असलेले ग्लोबल कोकण संस्थेचे संस्थापक श्री संजय यादवराव यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहणार आहेत. दिनांक 16 जुलै 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता शिवाजी मंदिर दादर येथे या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संजय यादवराव यांच्या संकल्पनेतून कोकणातील पर्यटन व्यवसाय खूप वाढीस लागला आहे. आता ग्लोबल कोकण .कोकण क्लब तसेच कोकण पर्यटन सहकारी संस्था आणि आता विविध विषयातले क्लब निर्माण करून त्याचे सभासदत्व घेऊन कोकणच्या विकासासाठी काम करण्याचे निश्चित झाले आहे .श्री संजय यादवराव यांच्या या सत्कारानिमित्त कोकण विकासाची एक परिषद या ठिकाणी घेण्यात येणार आहे. यामध्ये विविध विषयांवर विविध तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, तरी कोकणातील तरुण-तरुणाने पर्यटन व्यवसायीक तसेच उद्योजक यांनी या परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन ग्लोबल कोकणचे संचालक श्री विकास मधुकर शेट्ये मांडणगड यांनी केले आहे