
गणपतीपुळेत समुद्राला उधाण आल्याने समुद्रात जाण्यासाठी पर्यटक, भाविकांना प्रवेश बंदी
सलग तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गणपतीपुळे समुद्र मोठ्या प्रमाणात खवळला असून उधाण आले आहे. पर्यटक, भाविक यांनी आंघोळीसाठी समुद्रात जावू नये अशी सूचना गणपतीपुळे ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणा, स्थानिक प्रशासन यांच्यावतीने करण्यात आले आहे.गणपतीपुळे परिसरातील भातशेतीमध्ये पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातरोपे कुजण्याची भिती व्यक्त केली जात आहे. भंडारपुळे पुलावर साचलेल्या पाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मालगुंड साई मंदिराजवळील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वहान असल्याने तुर्तास ये-जा बंद करण्यात आली आहे. कोतवडे, नेवरे आदी गावातील नद्या दुथडी भरून वहात असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. www.konkantoday.com




