
रत्नागिरी शहरानजिकच्या सोमेश्वर परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार
रत्नागिरी शहरानजिकच्या सोमेश्वर परिसरात बिबट्याची दहशत वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष राहुल पवार यांच्या मालकीचे पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्यावर हल्ला करून बिबट्याने त्याला ठार मारले आहे. तत्पूर्वी राहुल पवार यांच्या ऑस्ट्रेलियन मांजरावर हल्ला करून बिबट्याने त्याला फस्त केले. वाडीतील दोन कुत्र्यांना बिबट्याने मारले आहे. वनविभागाने बिबट्याला पिंजर्यात पकडून नैसर्गिक अधिवसात नेवून सोडावे अशी मागणी राहुल पवार यांच्या सोमेश्वर परिसरातील नागरिकांनी केली आहे.www.konkantoday.com