
कशेडी बोगद्याची आयआयटी पथकाकडून पाहणी
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात १४ ठिकाणी लागलेल्या गळतीमुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग खडबडून जागे झाला आहे. झरे किंवा डोंगरावरील विहिरीचे पाणी बोगद्यात झिरपत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील आयआयटी पथकाचे प्रा. एस. के. यांनी बोगद्यात गळती लागलेल्या ठिकाणांची पाहणी केली.कशेडी बोगद्यातून दोन्ही दिशांचा प्रवास वेगवान झाला असला तरी ठिकठिकाणी लागलेल्या गळतीमुळे प्रवासात नवे विघ्न आले आहे. बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. ग्राऊटींगचे काम वेगाने सुरू असून दोन पथके दिवस-रात्र कार्यरत आहेत. २० कामगारांच्या मदतीने गळती थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. ग्राऊटींगचे काम पूर्ण होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी यापूर्वीच सांगितले आहे.कशेडी बोगद्यात सुरू असलेली गळती झरे किंवा डोंगरावरील विहिरींचे पाणी झिरपून खाली येत असल्याचे पाहणी अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आयआयटीच्या पथकाचे प्रा. एस. के. यांनी कशेडी बोगद्यातील गळती लागलेल्या ठिकाणांची संपूर्ण पाहणी केली.www.konkantoday.com