
पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्याने संगमेश्वर तालुक्यातील ४३जागा रिक्त
पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्याने संगमेश्वर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या जागा पुन्हा रिक्त राहिल्या आहेत .अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपली आहे .फक्त ६ ग्रामपंचायतीमुळे १५अर्ज दाखल झाले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या रिक्त असलेल्या ८६ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला होता.दि ३१मे ते १६ जुन या कालावधीत अर्ज दाखल करण्याची मुदत होती .ओझरे बुद्रुक, उंबरे, श्रृंगारपूर, कळंबुशी ,परचुरी तर्फे सावर्डा ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदासाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत.प्राप्त अर्जाची छाननी दिनांक ७ जूनला पूर्ण झाली .दि १० जुन रुजा दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.आवश्यकता भासल्यास दिनांक ते २३ जूनला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वेत मतदान होईल दिनांक २४ जुन रोजी मतमोजणी होणार आहे