
दापोली शहर आणि जालगाव परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत
दापोली शहर आणि जालगाव परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून तातडीने प्रशासनाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी जालगांव बर्वे आळी परिसरात एका महाविद्यालयीन युवतीवर पाच कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या महिनाभरात जालगाव येथे बर्वे आळी, कुंभारवाडी भागात चार, तर दापोली काळकाई कोंड परिसरात एका विद्यार्थ्यासह चार ते पाच जणांवर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला केल्याच्या घटना घडल्या. भटक्या कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या या घटनांमुळे परिसरातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.www.konkantoday.com