
पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार-हवामान अभ्यासक पंजाबराव डख
सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला आहे. पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डखांनी वर्तवला आहे.




