
रत्नागिरी शहरात उबाठाला खिंडार माजी नगरसेवक राकेश उर्फ बाबा नागवेकर यांच्या सहित माजी नगरसेविका मीराताई पिलणकर यांचा शिवसेनेत प्रवेशपालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या कार्यप्रणावर विश्वास ठेवत केला शिवसेनेत प्रवेश
रत्नागिरी शहरात उबाठा गटाचे माजी नगरसेवक राकेश उर्फ बाबा नागवेकर आणि माजी नगरसेविका मीराताई पिलणकर यांच्या सहित शेकडो कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी यांनी उबाठा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्नचे सदस्य रत्नागिरीचे किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थित शिवेसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत रत्नागिरी मधील ग्रामस्थांनी आज उबाठा गटाला सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या माध्यमातून विकसाला चालना मिळावी त्यांच्या माध्यमातून विकासाची कामे पूर्ण व्हावीत माझ्या प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी ते हातभार लावतील असा विश्वास यावेळी प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केला.पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्तेयांनी शिवसेनेते जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी माजी नगरसेवक राकेश उर्फ बाबा नागवेकर यांच्या सहित माजी नगरसेविका मीराताई पिलणकर, नितीन सुर्वे, मंदार जोशी, विक्रांत पिलणकर, मोरेश्वर मोरे, राहुल पिलणकर, महेश मोरे, शेखर भोगले, पंकज पिलणकर आदीनी प्रवेश केला आहे.