
मगरींपासून चिपळुणातील नागरिकांना भयमुक्त करा, चिपळुणातील नागरिकांची मागणी
चिपळूण शहरातील बाजारपेठेत शिवनदी पुलाजवळ भर रस्त्यात रात्रीच्यावेळी आलेल्या अजस्त्र मगरीच्या मुक्त संचारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात शहरातील नागरिकांनी गुरूवारी येथील वनविभागाला पत्र देवून मगरींपासून नागरिकांना भयमुक्त करावे, असे पत्र दिले आहे. तर मगरींचा अधिवास असलेल्या शिवनदीत पुलाजवळच्या दोन्ही बाजूस संरक्षक जाळी बसवण्यात यावी, असे पत्र वनविभागाने नगरपरिषदेला पाठवले आहे.शहरातील माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, कैसर देसाई, समीर कोवळे, संतोष चोगले, निखिल पवार, अभिषेक कदम यांनी गुरूवारी विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांना निवेदन दिले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चिपळूण शहर परिसरामध्ये शिवनदी व वाशिष्ठी नदी अशा दोन नद्या आहेत. या नद्यांमधून गेल्या काही वर्षात मगरींचे वास्तव्य व वृद्धी होत आहे. या मगरी अनेकदा नदीच्या वरील काठावर येतात. तसेच आता तर भर हमरस्त्यावरदेखील पिरू लागल्या आहेत. या अगोदर विविध वस्त्यांमध्येही त्या आलेल्या आढळल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिक भयभीत आहेत. www.konkantoday.com