
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे राष्ट्रीय स्पर्धेत युवा खेळाडूंच्या कौशल्याचे प्रदर्शन
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टचा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या आठव्या ज्युनिअर नॅशनल लगोरी चॅम्पियनशिप स्पर्धेत युवा खेळाडूंच्या कौशल्याचे प्रदर्शन पहावयास मिळत आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतातील १७ राज्यंमधून ३१ संघ सहभागी झाले आहेत.लगोरी या खेळाची लोकप्रियता आता देशभरात पसरली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १७ राज्य हे त्याचेच द्योतक आहे. विविध राज्यामधून आलेले १४ मुलांचे संघ आणि १७ मुलींचे संघ हे खेळाडूंमधील लगोरीची वाढती लोकप्रियता अधोरेखित करतात. स्पर्धेसाठी गोवा, झारखंड, अरूणाचल प्रदेश, दिल्ली, मध्यप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, नागालँड, बिहार, दादरा आणि नगर हवेली, गुजरात, पॉंडेचेरी, आसाम, उत्तराखंड, हरियाणा, महाराष्ट्र (मुंबई) आणि कर्नाटक या राज्याचे संघ सहभागी झाले आहेत. हे वैविध्यपूर्ण प्रतिनिधीत्व खेळाचे व्यापक आकर्षण आणि स्पर्धात्मक भावना अधोरेखित करते. ५५० हून अधिक खेळाडूंनी स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावल्यामुळे स्पर्धा चुरशीच्या होत आहेत.www.konkantoday.com