
राज्यातील सरपंच आपल्या विविध मागण्यांसाठी ४ जुलै रोजी मुंबईत धडकणार
राज्यातील सरपंच आपल्या विविध मागण्यांसाठी ४ जुलै रोजी मुंबईत धडकणार आहेत. मानधन वाढीबरोबरच राज्यातील सरपंचांना दरमहा १५००० रुपये व उपसरपंच यांना ७००० रुपये मानधन देण्यात यावे, महाराष्ट्रातील महसूली विभागानुसार विधान परिषदेत सरपंच आमदार प्रतिनिधी असावा. कॉम्प्युटर ऑपरेटरची नियुक्ती करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात यावे, आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.गावातील स्ट्रीट लाईटचे वीज बिल शासनाने भरावे मंत्रालयीन कामकाजासाठी सरपंच यांना व्ही.आय.पी. पासची व्यवस्था करावी (सरपंच यांना मंत्रालयात प्रवेश १० ते ०५ या वेळेत असावा) राज्यातील आजीमाजी सरपंच, उपसरपंच यांचे थकीत मानधन त्वरित जमा करावे. मुंबईसह जिल्हा परिषद व पंचायत समिती या ठिकाणी सरपंच यांना कार्यालय देण्यात यावे. सरपंचावर हल्ला करणार्याच्या विरोधात विशेष संरक्षण कायदा करण्यात यावा.www.konkantoday.com