
रत्नागिरी शहरात रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर बसवणार्या फेरीवाल्यांवर रत्नागिरी नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेने कारवाई सुरू केली आहे. शनिवारी भर पावसात रामआळी, एसटी स्टँड परिसरातील हातगाड्यांवर कारवाई केली. त्याचबरोबर वाहतुकीला आणि पादचार्यांना अडथळा होईल, अशा पद्धतीने बसलेल्या नायलॉन दोरी विक्रेत्यावरही दंडात्मक कारवाई केली, रत्नागिरी शहरातील बाजारपेठांच्या ठिकाणी असलेल्या अरूंद रस्त्यांमध्ये अनेक फेरीवाले, फळविक्रेते बसतात. या फळ विक्रेत्या हातगाडीवाल्यांना कुणी जाब विचारला तर त्यांच्याशी उद्धटपणा करतात, अशा तक्रारी येत होत्या. त्यावर उपाय म्हणून गुरूवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेत पथक कार्यरत झाले. अतिक्रमण हटाव मोहिमेत जप्त केलेली आंबे, केळी रिमांड होमला देण्यात आली. हातगाडीसह फळांचे क्रेट, वजन काटे जप्त करण्यात आले. हातगाड्या, काटे, क्रेट, नायलॉन दोर्यांचे बंडल दंड वसूल करून परत दिले जाणार आहेत. www.konkantoday.com




