
अन्न व भेसळ अधिकार्यांच्या कारवाईनंतर चिपळुणात बेकर्या होवू लागल्या चकाचक
चिपळूण शहरातील मार्कंडी भागातील केक ऑफ डे या बेकरीमध्ये अस्वच्छतेत तयार केल्या जाणार्या बेकरीजन्य पदार्थांचा पर्दाफाश झाल्यानंतर आता अन्य बेकरी मालकांना जाग आली आहे. अनेकांनी बेकर्या भटारखान्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यात बर्याच ठिकाणी अस्वच्छतेचा कळस असल्याचे चित्र आहे.शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता गेल्या काही वर्षापासून बेकरी पदार्थांच्या मागणीत मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वी बाजारपेठेत दिसणार्या मोजक्याच बेकर्यांच्या संख्येत आता कमालीची वाढ झाली आहे. शहराच्या कानाकोपर्यात बेकर्या दिसून येत आहेत. पूर्वी काही मोजक्याच बेकर्यांमध्ये विविध खाद्यपदार्थांचे उत्पादन केले जात होते. तेथून अन्य बेकर्यांना त्याचा पुरवठा होत असे, मात्र त्यातून मिळणारे पैसे व स्वतः तयार करून पदार्थ विकल्यास मिळणारे पैसे यात मोठा फरक असल्याने आता बहुतांशी बेकर्यांनी स्वतःचे उत्पादन सुरू केले आहे.www.konkantoday.com