
मंडणगड तालुक्यातील घोसाळे रातांबेवाडी येथे घरावर झाड पडून महिला जखमी
मंडणगड तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शनिवारी घोसाळे, रातांबेवाडी येथे एका घरावर माड कोसणून महिला जखमी झाली.शनिवारी झालेल्या अतिवृष्टीत शांताराम पोस्टुरे यांच्या घरावर नारळाचे झाड पडून घराचे ३२००० रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये रूनिता पोस्टुरे यांच्या डोक्यावर सिमेंट पत्रा पडून त्या जखमी झाल्या.त्यांच्यावर मंडणगड ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. तहसीलदार श्रीधर गालीपिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मनोहर पवार यांनी तातडीने मदत कार्यात सहभाग नोंदवून नुकसानीचा पंचनामा पूर्ण केला आहे.www.konkantoday.com