
बोगस धान्य वाटप रोखले जाणार, रेशनकार्डधारकांची होणार ई-केवायसी तपासणी
शासनाने राष्ट्रीय अन्फ सुरक्षा विभागा अंतर्गत रेशन कार्ड ई-केवायसी करण्यात यावा असा नवीन आदेश जाहीर केला आहे. ही प्रक्रिया ३० सप्टेंबर पर्यंत करून घेणे आवश्यक आहे. यामुळे बोगस धान्य वाटपास आळा बसेल असा विश्वास शासनाला वाटत आहे. मात्र पुन्हा एकदा रेशनकार्ड ई-केवायसी करण्यासाठी फेर्या माराव्या लागणार असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.धान्यवितरणात पारदर्शकता येणे करिता ई-केवायसी करणे आवश्यक आले. शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागा अंतर्गत रेशन कार्ड ई-केवायसी करण्यात यावी असा नवीन आदेश जाहीर केला आहे. कार्डधारकाने ई-केवायसी केला नाही आणि अधिकार्यांना तपासणीत काही त्रुटी आढळल्या तर त्याचे नाव रेशन कार्डमधून वगळण्याचे आदेश दिले आहेत. जे रेशनकार्ड धारक ई-केवायसी करणार नाहीत त्यांना धान्य वितरित केले जाणार नाही. प्रत्येक रेशन कार्ड धारकाला ई-केवायसी अपडेट करणे बंधनकारक आहे. यातून बनावट शिधापित्रका धारक शोधण्यात येत आहेत. अनेक ग्राहक चुकीच्या पद्धतीने रेशनवरील धान्य घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. www.konkantoday.com