
राजापुरातून तरुणी बेपत्ता
*रत्नागिरी, दि.26 : स्वरा सचिन धुरी, वय वर्षे 28, या 2 जून रोजी बंगलवाडी, राजापूर येथून सकाळी 11 वा. पासून नापता झाल्या आहेत. त्यांची उंची 4.5 फूट, अंगाने मध्यम, रंग गोरा, केस काळे लांब, डोळे काळे, नाकात सोन्याची पुल्ली, कानात सोन्याची कुडी, गळ्यात सोन्याची चेन व एकेरी सराचे मंगळसुत्र, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या त्यामध्ये बेन्टेक्सच्या पिवळसर बांगड्या, पायत पैंजण, अंगात लालसर गुलाबी रंगाची साडी व ब्लाऊज, पायात लालसर रंगाची सँडल, हातात गुलाबी रंगाची पर्स, समोरिल दात थोडे पुढे आलेले आहेत. या महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा त्या कुठेही दिसल्यास पोलीस निरीक्षक, राजापूर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.000