
शासनाने तातडीने लक्ष न घातल्यास राज्यभर २७ जूनपासून ठेकेदार आंदोलन करणार
गेल्या आर्थिक वर्षात राज्यात जवळपास एक लाख कोटीची विकास कामे सुरु आहेत.ठेकेदारांनी दहा कोटी रुपये अनामत रक्कम शासनाकडे जमा केलेली आहे. अनेक विकास कामे सुरू आहेत. मात्र या झालेल्या कामांचे पैसे मिळत नसल्याने ठेकेदारांची आर्थिक पिळवणूक होत असून ठेकेदारांसह कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने तातडीने लक्ष न घातल्यास राज्यभर २७ जूनपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा दिला असून रत्नागिरीतही तसे निवेदन ठेकेदारांनी दिले.www.konkantoday.com