
महामार्गावरील वृक्ष लागवड निव्वळ धुळफेक, वृक्ष हक्क समितीचा आरोप
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांवर कुर्हाड चालवण्यात आल्यानंतर रूंद झालेल्या रस्त्याच्या दुतर्फा व मध्यभागी पुन्हा वृक्ष लागवड करण्याचे आश्वासन महामार्ग विभाग आणि कंत्राटदार कंपनीने येथील वृक्ष हक्क समितीला दिले होते. मात्र प्रत्यक्षात करण्यात आलेली वृक्ष लागवड ही निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप समितीने केला आहे. समितीमधील काही सदस्यांनी लागवड केलेल्या वृक्ष रोपांची पाहणी केली असता आश्वासनानुसार ती झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समिती सदस्य पुन्हा आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. www.konkantoday.com




