
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील मुर्शी चेकपोस्ट येथे गुरांची अवैध वाहतूक, दोघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील मुर्शी चेकपोस्ट येथे गुरांची अवैध वाहतूक करणारी बोलेरो पिकअप साखरपा पोलिसांनी पकडली. पाळीव जनावरे व गाडी असा एकूण ५ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शाहूवाडी येथील बाजीराव भिकाजी सुतार (३७) वर्षे व रवीराज पांडुरंग व्हनागडे (२७) या दोन तरूणांवर देवरूख पोलीस ठाण्यात संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाजीराव व रवीराज हे एकमेकांच्या संगनमताने बोलेरो पिकअप गाडी क्रमांक (एमएच ०९, सीयु-६७०६) मधून गाय, बैल, वासरे यांना दाटीवाटीने बांधून घेवून जात होते. मुर्शी चेकपोस्ट येथे तपासणीदरम्यान ही गाडी पकडण्यात आली. यावेळी जनावरांना दुखापत होणार नाही, याची काळजी घेतली गेलेली नव्हती. तसेच वाहतूक परवान्याचे उल्लंघन करून जनावरांच्या कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.www.konkantoday.com