
सावंतवाडी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी
सिंधुदूर्गासह महाराष्ट्रात यंदा उष्णतेच्या लाटेनी उच्चांक गाठला होता..प्रत्येक जण पाऊस कधी पडतो या कडे वाट बघत होता.. अखेर गुरुवारी पहाटे पासून सावंतवाडी सह अन्य भागात वरुणराजा बरसला..विजेच्या गडगडाटासह पाऊसांनी दमदार हजेरी लावली आहे..सकाळी ५.०० वाजल्या पासूनच अचानक विजेच्या लखलखाटासह पाऊस सुरु झाला व संपुर्ण परिसरात थंडावा करुन गेला..जोरदार लागलेल्या पाऊसांच्या सरीमुळे शेतकरी वर्गाकडूनही समाधान व्यक्त होत असून आता कोकणातील शेतीच्या कामांना हळूहळू वेग येणार आहे.