पर्यटनाच्या समस्यांबाबत देवेंद्र फडणवीसांना साकडे

दापोली निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांकडून दापोलीला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर नेण्याच्या घोषणा होतात. मात्र येथील पर्यटन व्यावसायिकांच्या पदरात काहीही पडत नाही. यामुळे त्रस्त व्यावसायिकांनी आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरवाजा ठोठावला आहे. दापोली किनारपट्टीला पर्यटनाच्या दृष्टीने वीज, पाणी, रस्ता व नेटवर्क या मुलभूत सुविधा देण्याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, दापोली तालुक्यातील लाडघर, मुरूड, हर्णे, आंबवली, आसूद गावात सुमारे छोटी मोठी अकराशे हॉटेल आहेत. ही सर्व हॉटेल समुद्र किनारपट्टीजवळ असून यामुळे किमान साडेसात हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. शासनाची कोणतीही मदत नसताना व कोणतेही प्रयत्न पर्यटनाकरिता नसताना केवळ कोकणी आपुलकी व इच्छाशक्तीच्या जोरावर हे व्यवसाय उभे आहेत. मात्र खंडित होणारा वीज पुरवठा, पाणी, रस्त्याची असुविधा, न मिळणारे नेटकर्व यामुळे व्यवसाय करताना अनेक अडचणी येतात.www.konkantoday.comपर्यटनाच्या समस्यांबाबत देवेंद्र फडणवीसांना साकडे
दापोली निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांकडून दापोलीला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर नेण्याच्या घोषणा होतात. मात्र येथील पर्यटन व्यावसायिकांच्या पदरात काहीही पडत नाही. यामुळे त्रस्त व्यावसायिकांनी आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरवाजा ठोठावला आहे. दापोली किनारपट्टीला पर्यटनाच्या दृष्टीने वीज, पाणी, रस्ता व नेटवर्क या मुलभूत सुविधा देण्याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दापोली तालुक्यातील लाडघर, मुरूड, हर्णे, आंबवली, आसूद गावात सुमारे छोटी मोठी अकराशे हॉटेल आहेत. ही सर्व हॉटेल समुद्र किनारपट्टीजवळ असून यामुळे किमान साडेसात हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. शासनाची कोणतीही मदत नसताना व कोणतेही प्रयत्न पर्यटनाकरिता नसताना केवळ कोकणी आपुलकी व इच्छाशक्तीच्या जोरावर हे व्यवसाय उभे आहेत. मात्र खंडित होणारा वीज पुरवठा, पाणी, रस्त्याची असुविधा, न मिळणारे नेटकर्व यामुळे व्यवसाय करताना अनेक अडचणी येतात.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button