
पुणे येथे निघालेल्या तरूणाचा मृत्यू
खेड ः दुचाकीने पुणे येथे जायला निघालेल्या इसमाच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्याचा उपचारादरम्यान कळंबणी रूग्णालयात मृत्यू झाला. निलेश नारायण गोरखे (३५) असे या इसमाचे नाव असून तो कोंडिवली काजवेवाडी येथील रहिवासी होते असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
उन्हाळी सुट्टीसाठी आपल्या मुळगावी आलेल्या निलेश हा दुचाकीने पुणे येथे जायला निघाला होता. मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे आला असता अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्याला तात्काळ येथील रहिम रूग्णालयात व तिथून कळंबणी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.