
मर्सिडिज ह्यावर्षी महाराष्ट्रात करणार 3000 कोटींची गुंतवणूक; उदय सामंत ह्यांची यशस्वी भेट !
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जर्मनी मधील स्टुटगार्ट येथील मार्सिडिज बेंझ च्या प्लॅन्टला भेट दिली. त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत आणि मर्सिडिज बेंझ चे कार्यकारिणी सदस्य डॉ. जॉर्ग बर्झर, संचालिका मॅरीना क्रेट्स, संचालक मार्टिन स्कल्झ, भारतातील कार्यकारी संचालक व्यंकटेश कुलकर्णी ह्यांच्यामध्ये महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली. त्यावेळी मार्सिडिज बेंझ ह्यावर्षी महाराष्ट्रामध्ये ₹ 3000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे मार्सिडिज बेंझ करून जाहीर करण्यात आले. त्यासमयी म. रा. औ. वि. म. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा उपस्थित होते.