
भोस्ते गांजा विक्रीच्या गुन्ह्यातून ८ वर्षानंतर ६ जणांची निर्दोष मुक्तता
खेड तालुक्यातील भोस्ते येथील ६ जणांनी ३०० ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी येथील पोलिसांनी समीर जसनाईक, गुलाम कादरी, मुदस्सर डावरे, लतिफ नालबंद, सलमान पावसकर, अब्दुल लतीन शेख या सहा संशयित आरोपींना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सहाही संशयितांची ८ वर्षानंतर निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपी यानी विक्रीसाठी ३०० ग्रॅम वजनाचा गांजा बाळगला होता. पोलिसांनी धाड टाकत ६ जणांना अटक केली होती. या प्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात १४ जुलै २०१५ रोजी दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी झाली असता साक्षीदारही तपासण्यात आले. संशयित आरोपींच्यावतीने ऍड. स्वरूप चरवळ यांनी केलेला युक्तीवाद खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने ग्राह्य धरत न्यायालयाने सहाजणांची निर्दोष मुक्तता केली. www.konkantoday.com