
मोटरसायकलच्या धडकेने एकाचा मृत्यू, आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल
कात्रोळी कुंभारवाडी, ता. चिपळूण येथील राहणारे संतोष तुकाराम पडवेकर हे व त्यांचे वडिल त्यांची मोटरसायकल (क्र. एमएच ०८ एक्स ६१६८) ही घेवून गुहागर-चिपळूण हायवे रोडने चालवित उमरोली पेट्रोल पंपात जात असताना समोरून येणारे आरोपी गजानन सुभाष बोडकर यांची मोटरसायकल (एमएच ०८ एवाय ०६९१) ही भरवेगाने चालवत येवून रॉंग साईडने फिर्यादी यांच्या मोटरसायकला धडक दिली. त्यामुळे फिर्यादी यांचे वडील दत्ताराम बेंडू पडवेकर (७५) यांचा मृत्यू झाला. चिपळूण पोलीस स्थानकात मोटरसायकलस्वार बोडकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com