
रत्नागिरी जिल्ह्यात विंधण विहिरीवर बसवण्यात आलेले हातपंपाची दुरूस्ती रखडल्याने पाणीटंचाईत भर
ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत पिण्याचे पाणी ग्रामीण जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे खोदलेल्या विंधन विहिरीवर बसवण्यात आलेल्या हातपंप विद्युतपंपाची दुरूस्ती गेल्या वर्षभरापासून रखडली आहे. सध्याच्या पाणीटंचाई काळात विशेष कृती आराखडा तयार करून हातपंप किंवा विंधन विहिरी योग्यरित्या कार्यरत राहण्यासाठी दुरूस्ती केली जावी, अशा सूचना आहेत. पण जिल्हास्तरावर टंचाई निवारणासाठी गतवर्षीपासून रखडलेली दुरूस्ती टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडत आहे. www.konkantoday.com