राजापूर तालुक्यातील नाटे येथील घेरा यशवंतगड किल्ल्याला नवा साज चढणार

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या राजापूर तालुक्यातील नाटे येथील घेरा यशवंतगड किल्ल्याच्या जतन-संवर्धन व सुशोभिकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. पुरातत्व विभागाकडून मंजूर झालेल्या सुमारे ८ कोटी १९ लाखाच्या निधीतून हे काम करण्ययात येत आहे.गेली अनेक वर्षे समस्त शिवप्र्रेमी व नाटेतील शिवसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज आडविरकर व त्यांचे सहकारी यशवंतगडाच्या डागडुजीसाठी पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून गडाच्या संवर्धन व सुशोभिकरणानंतर यशवंतगडाला नवा साज चढणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button