
राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेत रत्नागिरीच्या यश चव्हाणने पटकावले सुवर्णपदक
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धा (इंडिया स्किल २०२४) या भारतातील सर्वात मोठ्या कौशल्य स्पर्धेमध्ये रत्नागिरीतील यश दिनेश चव्हाण याने केशभूषा या कौशल्यामध्ये संपूर्ण भारतातून सुवर्णपदक पटकावले आहे.यश दिनेश चव्हाण हा महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील मुलगा आहे. वयाच्या १२ व्या वर्षापासूनच त्याने वडिलांच्या सलूनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. अगदी कमी वयातच यशने केशभूषेतील विविध कौश्य आत्मसात केली. दहावी झाल्यानंतर यशने मुंबई गाठली. उदय टक्के ऍकॅडमीमध्ये ऍडमिशन घेवून दोन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. उदय टक्के सरांच्या मार्गदर्शनाखाली यश पहिल्यांदा २०२१ मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेमध्ये (इंडिया स्किल २०२१) सहभागी झाला होता. इंडिया स्किल ही खेळाडूंमधील कौशल्य दाखवणारी भारतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यामध्ये एकूण ७५ कौशल्यांचा समावेश आहे. www.konkantoday.com