
रत्नागिरी नगर परिषदेची ऐशी की तैशी, एकाच पावसात गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी जयस्तंभ परिसरात
काही दिवसापूर्वी भर उन्हाळ्यात रत्नागिरी नगर परिषदेच्या नळ पाणी योजनेच्या पाईप फुटल्याने जयस्तंभ परिसर जलमय झाला होता असे असताना काल रात्री पडलेल्या पावसामुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी आज सकाळी जयस्तंभ परिसरात सर्वत्र पसरले होते खुद्द रत्नागिरी नगर परिषदेच्या आसपासच्या भागातच असे प्रकार घडत असल्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेचे प्रशासक झोपा काढत आहेत की काय आता असा सवाल नागरिकांच्यातून उपस्थित होत आहे जयस्तंभ सारख्या गजबजलेल्या भागात हे दुर्गंधी पाणी सकाळी देखील वाहत होते तसेच हे पाणी रस्त्याच्या पलीकडे जाऊन जावकर प्लाझा रस्त्याच्या परिसरातही गेले होते त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे पावसाळ्याच्या आधी रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उघड झाला आहे काही दिवसांपूर्वी अशीच गटारे फुटल्यामुळे पाणी रस्त्यावर आले होते मात्र नगर परिषदेने तात्पुरती मलमपट्टी केली होती पहिल्याच पावसात ही अवस्था असेल तर पुढे काय होणार असा नागरिकांना प्रश्न पडला आहेwww.konkantoday.com