दापोली तालुक्यातील जालगांवमध्ये तरूणाची आत्महत्या

दापोली तालुक्यातील जालगाव-पांगरवाडी येथे ३२ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ च्या दरम्यान उघडकीस आली. श्याम हरिश्‍चंद्र वाघमारे (सध्या रा. जालगाव-पांगरवाडी, मुळचा सहयोगनगर, निगडी, ता. हवेली, जि पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष सरकटे व श्याम वाघमारे हे दोघेजण जालगाव पांगारवाडी येथे दोन महिन्यांपासून एकत्रित रहात होते. श्याम याला दारूचे व्यसन होते. गेल्या दोन दिवसांपासून आशिष व श्याम हे दोघे बोलत नव्हते. मंगळवारी सकाळी ६ वाजता उठल्यावर आशिषने श्याम याने लाल रंगाच्या वायरने राहत्या खोलीत गळफास घेतल्याचे दिसले. आशिषने जवळ जावून पाहिले असता कोणत्याही प्रकारची हालचाल दिसली नाही. म्हणून त्याने दापोली पोलिसांत याची खबर दिली. दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र नलावडे करीत आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button