
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवार यांनी केली-राज ठाकरें
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवार यांनी केली, काँग्रेस फोडली, छगन भुजबळांना पाठवून बाळासाहेबांची शिवसेना फोडली, असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगरसेवक खोके-खोके देऊन फोडले, असा आरोप करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांवरही परखड टीका केली आहे.राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटलं की, फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही आणि कधी होणारही नाही, पण या सगळ्यात जे आज बोलतायत आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला, तुम्ही जे बसलेले आहाता, कुठच्या तरी आघाडी, जरा एकमेकांकडे एकदा बघा, आपण काय उद्योग केलेत ते. याचं उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगरसेवक खोके-खोके देऊन फोडले होतेत ना, तेव्हा काही नाही वाटलं. अहो, मागितले असते, तर दिले असते. पण काय आहे, ते म्हणतात ना, ढेकणासंगे हिराही भंगला. बरोबर शरद पवार बसलेत.शरद पवारांनाही राज ठाकरेंनी या सभेतून हल्लाबोल केला आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, फोडाफोडीच्या राजकारणाची महाराष्ट्रात कुणी सुरुवात केली असेल, तर ती शरद पवारांनी केली. पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं. 77-78 साली पुलोद स्थापन केलं. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं, ते शरद पवारांनी या गोष्टीची सुरुवात केली.1991 पुन्हा याचं शरद पवांरानी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची शिवसेना फोडायला लावली. त्यावेळी शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम शरद पवारांनी केलं. ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील. मी काय माझा बाहेरून पाठिंबा आहे, मी काहीही बोलू शकतो. आपल्याला थोडी फेव्हिकॉल अजून लागलाय. त्याच्यानंतर नारायण राणे यांच्यासोबत आमदार घेऊन काँग्रेसने पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे.www.konkantoday.com