
मंडणगड तालुक्यात गोदाम परिसरात अवैध धंद्यांना ऊत
मंडणगड शहरातील शासकीय धान्य गोदामाच्या परिसरात मद्यपींनी धुमाकूळ घातला असून परिसरात मद्यांच्या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसून येत आहे. मद्यपींनी मद्याचे सेवन करून जागेवर फेकून दिलेल्या रिकाम्या बाटल्या व परिसरात नागरिकांनी फेकलेल्या कचर्यामुळे विविध समस्या निर्माण होत आहेत. याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. www.konkantoday.com