बकरीवर हल्ला करणार्‍या बिबट्याला पळवून लावणार्‍या शेतकरी प्रकाश कांबळे यांचे कौतूक

रत्नागिरी तालुक्यातील विल्ये येथील शेतकरी प्रकाश बाबाजी कांबळे यांच्या मालकीच्या ३५ बकर्‍या रानात चरण्यासाठी नेले असता गुरूवार दि. ९ मे रोजी सकाळच्या दरम्याने सड्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील एका छोट्या बकरीवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता बकर्‍यांचे मालक प्रकाश बाबाजी कांबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मोठ्या धैर्याने बकरीला वाचविण्यासाठी बिबट्याजवळ धाव घेत आपल्या बकरीचा जीव वाचविला. हा प्रकार दिवसाढवळ्या घडल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button