
मतदानासाठी एसटी गाड्या आरक्षित केल्याने खेड आगारात प्रवाशांचा खोळंबा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील एसटी आगाराच्या ४४ बसेस मतदान साहित्य वाहतुकीसाठी आरक्षित करण्यात आल्याने सलग दोन दिवस लांब पल्ल्यासह तालुक्यातील ग्रामीण भागातील ३७ मार्गावरील ७१ फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द फेर्यामुळे रेल्वेतून गावी आलेल्या चाकरमान्यांसह ग्रामीण मार्गावर जाणार्या प्रवाशांचा खोळंबा होवून स्थानकात तासनतास तिष्ठत बसावे लागले. काही प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेत घर गाठले.www.konkantoday.com