
भारतातील विमान कंपनी फ्लाय 91ने सिंधुदुर्ग ते हैदराबाद विमान सेवा सुरु केली
भारतातील विमान कंपनी फ्लाय91ने सिंधुदुर्ग ते हैदराबाद विमान सेवा सुरु केली आहे. हे विमान चिप्पी (सिंधुदुर्ग) या विमानतळावर आठवड्यातून तीन वेळा उड्डाण घेईल. या सेवेमुळे सिंधुदुर्ग आणि तिरुपती (आंध्र प्रदेश) मधील अंतर कमी झाला आहे, तसेच या तीर्थयात्रेला जाणार्या प्रवाशांचा हा लांबलचक प्रवास फ्लाय91ने सुख सिविधाने समृद्ध आणि आरामदायी बनवला आहे अशी माहिती फ्लाय91च्या अधिकार्याने दिली. सिंधुदुर्ग ते बेंगळुरूपर्यंतच्या फ्लाइट ऑपरेशन्ससह सुरू झालेल्या या विमान सेवेने आता हैदराबादला तिच्या विमान सेवा समाविष्ट केल्या आहेत आणि पुण्यासारख्या इतर स्थळांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे. प्रवासी फ्लाय91 विमान सेवेला निवडून त्यांचा 15 तासांचा सिंधुदुर्ग ते हैदराबादचा (624 किमी) बस प्रवास आता 1 तास 25 मिनटात करू शकणार आणि त्यानंतर तिरुपतीला जाण्यासाठी पुढील प्रवासाचा पर्याय निवडू शकतात. कंपनीचे पॅकेज 11,500 रु. प्रति व्यक्ती पासून सुरु होतात, या पॅकेजमध्ये हैदराबादच्या प्रसिद्ध चारमिनारला भेट देणे, स्वादिष्ट हैदराबादी खाद्यपदार्थांचा आनंद घेणे आणि तिरुपती मंदिरात आशिर्वाद घेणे समाविष्ट आहे. विद्यार्थ्यांसाठी खास टूर पॅकेजेस देखील आहेत. www.konkantoday.com