
खेड लोकअदालत तारखेत बदल
जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समितीच्यावतीने येथील न्यायालयात ५ मे रोजी होणार्या लोकअदालत तारखेत बदल करण्यात आला आहे. ही राष्ट्रीय लोकअदालत २७ जुलै रोजी होणार आहे. ज्या नागरिकांना २७ जुलै रोजी होणार्या लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालय व तालुका विधी सेवा समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.www.konkantoday.com