
प्रकाश आंबेडकरांनी रत्नागिरीतील सभेला फोनवरून केले संबोधित
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शहरातील लक्ष्मीचौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे येणार होते. दरम्यान काही कारणांनी आंबेडकर यांचा दौरा रद्द झाल्याने त्यांनी फोनवरून सभेला संबोधित केले.यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी मारूतीकाका जोशी हेच योग्य उमेदवार आहेत. मारूतीकाका जोशी यांच्या रूपाने कोकणातील कुणबी समाजाला प्रतिनिधीत्व मिळत आहे. त्यामुळे जोशी यांना चांगले मताधिक्य मिळेल व ते चांगले काम करतील, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला. तसेच कार्यकर्त्यांना देखील या निवडणुकीत चांगले काम करण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला. www.konkantoday.com