
गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांच्या हाती प्रतीक्षा यादीवरील तिकिटे
उन्हाळी सुट्टी हंगामात नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांच्या हाती प्रतीक्षा यादीवरील तिकिटे पडली आहेत. जनशताब्दी एक्सप्रेसच्या द्वितीय श्रेणीची प्रतीक्षा यादी चारशे पार झाली असून १ मेपर्यंतची प्रतीक्षा यादीची क्षमताच संपली आहे. याशिवाय कोकणकन्या एक्सप्रेसच्या शयनयान डब्यांची प्रतीक्षा यादी ३०० ते ४०० दरम्यान असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. उन्हाळी सुट्टीसह गणेशोत्सव, होळी व इतर सणांच्या कालावधीत मध्य व कोकण रेल्वे मार्गावरील नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी २०० पेक्षा अधिक असते. www.konkantoday.com