
गुहागर असगोली मधलीवाडी येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराच्या मृत्यू
* गुहागर असगोली मधलीवाडी येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराच्या मेंदूला दुखापत झाली होती. त्याचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. १९) दुपारी मृत्यू झाला.सतेज किसन घाणेकर (वय ३८) असे त्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात त्याची पत्नी व दोन लहान मुले Pआहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनूसार गुरूवारी सतेज गुहागरातून असगोलीला जात होता. या वेळी त्याच्याबरोबर दुचाकीवर त्याचा लहान मुलगा होता. असगोली मधलीवाडी येथे असगोलीकडून गुहागरकडे एक टेम्पो येत होता. रस्त्याच्या बाजूला खाली लोंबकळणारी महानेटची केबल या टेम्पोत अडकून तुटली आणि तिचा फटका सतेजच्या दुचाकीला बसला. ही केबल इतक्या वेगाने येऊन आपटली की, सतेज दुचाकीवरून तोल जाऊन मुलासह खाली पडला. आणि जखमी झाले होतेwww.konkantoday.com